पाश्चात्य संस्कृती सोडून स्वधर्म वाढवा....
प्रतिनिधी । भगुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोपान महाराज कणेरकर यांचे व्याख्यान शहराध्यक्ष सुमित चव्हाण व उपशहरअध्यक्ष श्याम देशमुख यांनी आयोजित केले होते यावेळी बोलताना महाराजांनी
पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण थांबवून नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करावे, तरुणाईने नैतिक मूल्ये नैतिक मूल्ये जपुन राष्ट्राभिमान बाळगावा तसेच स्वधर्म, संस्कृती आणि सभ्यता टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रबोधनकार सोपान महाराज कनेरकर यांनी केले. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे भरकटणाऱ्या तरुणांनी आत्मपरीक्षण करून भारतीय परंपरांचा अभिमान बाळगण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भगुर येथे सोमवारी (दि.30मार्च) सायं. छत्रपती शिवाजी महाराज चौक भगुर येथे कार्यक्रमचे आयोजन केले होते...
मुलींनी आपल्या वेशभूषेबाबत सजग राहावे, अंग पूर्ण झाकेल अशी वेशभूषा करावी. जसे महागडा मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कव्हर लावतो, तसेच जीवनातही सुरक्षिततेची काळजी
घेणे आवश्यक असल्याचे प्रबोधनादरम्यान कनेरकर महाराज यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले, यावेळी कनेरकर महाराज यांनी तुम्ही कसे जगलात, यापेक्षा किती लोकांसाठी जगलात हे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती लोकांना जेवू घातले, यापेक्षा काय जेवू घातले हे महत्त्वाचे आहे.
एकत्रित कुटुंबपद्धती गरजेची
आधुनिकतेच्या नावाखाली परंपरा व संस्कृतीचा विसर पडत असून, खंत आहे. भारताची संस्कृती, आदर्श परंपरा आणि एकत्रित कुटुंबपद्धती लोप पावत असून, ती जपण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असे महाराजांनी अधोरेखित केले,
तुम्हाला किती मुले आहेत हे
महत्त्वाचे नसून, तुमची मुले किती
नैतिकतेच्या मार्गावर आहेत हे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. इतर धर्मीय आपले सण शिस्तबद्ध पद्धतीने साजरे करतात, मात्र गणपती,
नवरात्र आणि रामनवमीला होणारा अतिरेक थांबवण्याची गरज तोडीसाठी धर्मप्रसारासाठी तरुणांनी संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले, 'नफरत नहीं, हम प्रेम के पुजारी है... गर्व से कहो हम हिंदुत्ववादी है,' असे
सांगत राष्ट्राभिमान बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. देशात जन्मलेल्या प्रत्येकाला हिंदुस्तानी असल्याचा अभिमान असावा, असे ते म्हणाले, सोशल मीडियाच्या युगात 'टेडी डे' आणि 'रोझ 'रोझ डे'सारख्खा संकल्पनपिक्षा आई-वडिलांचा सन्मान करणे अधिक महत्वाचे असल्याचा संदेश त्यांनी दिला. संमेलनाच्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शेटे,ललित भदे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष सौ. प्रेरणाताई बलकवडे, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके, एकनाथरावजी शेटे नगरसेवक दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, विशाल बलकवडे, शंकर करंजकर, बबलू जाधव,अमोल इंदारखे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.