नांदेड :-आपले सरकार सेवा केंद्र वाटप प्रक्रीयेअंतर्गत प्राप्त झालेल्या आक्षेपांची छानणी प्रक्रीया सध्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु आहे. सदर छानणी प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर 23 एप्रिल 2026 नंतर आक्षेपाअंती यादी व पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. सदर प्रक्रीया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक राबविण्यात येत आहे.
सदर प्रक्रीया ऑनलाईन असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नागरिक, अर्जदारांनी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी प्रत्यक्ष भेट देवू नये. छाननीनंतरची यादी, वेळापत्रक व इतर सर्व अद्ययावत माहिती ही अधिकृत संकेतस्थळावर https://nanded.gov.in प्रसिध्द करण्यात येईल. सर्वानी अधिकृत संकेतस्थळावर नियमित माहिती पाहावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, सेतु समिती नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी केले आहे.