एन.एम.एम.एस परीक्षा मध्ये लहान येथिल जिल्हा परिषद हायस्कूल शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/03/2026 3:53 PM

नांदेड :- तालुका अर्धापूर  मौजे लहान येथील जिल्हा परिषद हायस्कूल लहान शाळा व गावकरी मंडळी, शालेय व्यवस्थापन समिती नेहमीच विविध उपक्रम राबवुन आदर्श शाळा करण्यासाठी वाटचाल करत आहे. 
याचाच भाग म्हणून NMMS उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत कार्यालय लहान व शालेय व्यवस्थापन समिती लहान तर्फे भव्य सत्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लहान नगरी चे प्रथम नागरिक सरपंच श्री.मा.सदाशिव पाटील इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शेख महेबुब, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर लालमे,विजयराव शेळके, गंगाप्रसाद वानोळे सह अनेक  गावकरी मंडळी उपस्थित होते. 
 यावेळी NMMS 2026 या परिक्षा मध्ये उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थ्यी  कु. समीक्षा मोरे, कु.अंतरा बिच्चेवार कु. अनन्या नरवाडे, कु. कार्तिकी दाढे, कु.स्वाराली सोनटक्के, 
कु. स्नेहा लालमे, कु. तेजस्विनी सोनटक्के, कु. संध्या मंत्रे, 
कु.अनुष्का कुराडे, कु. हर्षदा सावंत, कु.निरंजना लोणे,  सुमेध लोणे, वेदांत सोळंके, विराट बोक्से या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत कार्यालय लहान व शालेय व्यवस्थापन समिती लहान तर्फे सत्कार करुन बक्षीस देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी योग्य नियोजन लावुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 
विद्यार्थ्यांचा सत्कार केल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय लहान व शालेय व्यवस्थापन समिती चे गावातील मंडळींकडून कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या