अजूनही विसर, चार वर्षांपासून भगूरकर प्रतीक्षेत,निवडणुकीपुरत्या घोषणा, प्रत्यक्षात कामाला गती नाही*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 25/02/2026 10:55 PM

*शासनाला वीर सावरकर पर्यटन सर्किटचा अजूनही विसर, चार वर्षांपासून भगूरकर प्रतीक्षेत,निवडणुकीपुरत्या घोषणा, प्रत्यक्षात कामाला गती नाही*
 
भगूर (प्रतिनिधी): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृती जपण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलेल्या “वीर सावरकर पर्यटन सर्किट” योजनेला चार वर्षांचा कालावधी उलटून गेला असला तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. त्यामुळे सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूरमधील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य शासनाने मोठ्या दिमाखात भगूरचा विकास करून येथे भव्य स्मारक, पर्यटन सुविधा, मार्गदर्शक केंद्र, माहितीगृह आणि मूलभूत सुविधा उभारण्याची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणांनंतर कागदोपत्री हालचाली वगळता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याचे चित्र दिसत नाही. निवडणुका जवळ आल्या की या योजनेची आठवण काढली जाते, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
भगूरकरांचे म्हणणे आहे की, सावरकरांच्या विचारांचा गौरव करण्यासाठी केवळ कार्यक्रम आणि अभिवादन पुरेसे नाही, तर त्यांच्या जन्मभूमीचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. पर्यटन सर्किटच्या माध्यमातून भगूरला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र चार वर्षांनंतरही प्रतीक्षाच हाती आली आहे.
स्थानिक सामाजिक संघटना व नागरिकांनी शासनाकडे तातडीने निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची मागणी भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, संभाजी देशमुख, सुनिल जोरे, संदेश बुरके, प्रविण वाघ, संतोष मोजाड, गणेश राठोड, भूषण कापसे, आकाश नेहरे, खंडू रामगडे, सुभाष पुजारी, भाऊसाहेब ससाणे,  विजय घोडेकर आदींनी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या