वसंतदादा मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांच्या विविध अडचणी आणि समस्या जाणून घेण्यासाठी खासदार विशाल पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार करताना व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, पायाभूत सुविधांची कमतरता, स्वच्छतेचे प्रश्न, पार्किंगची समस्या, सुरक्षेचे मुद्दे तसेच प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य याबाबत त्यांची मते जाणून घेतली.
व्यापाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांची आणि मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांकडे त्या पाठपुरावा करून सोडविण्याचा शब्द दिला. मार्केट यार्ड हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा असून येथे कार्यरत असलेल्या व्यापाऱ्यांना सुसज्ज आणि सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस आणि सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरळीत चालावा, बाजारपेठ अधिक सक्षम व्हावी आणि ग्राहकांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी मांडले.