सांगलीतील शंभर फुटी रोडची ही विदारक स्थिती पहा! गटारातून काढलेला कचरा रस्त्यावरच तसाच टाकून दिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
एकीकडे स्वच्छतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मुख्य रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचू द्यायचे, हा कसला कारभार?
आमची मागणी:
हा कचरा तात्काळ उचलण्यात यावा.
केवळ कचरा काढून रस्त्यावर टाकण्यापेक्षा त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी.
जर हा कचरा लवकरात लवकर उचलला गेला नाही, तर लोकहित मंच स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल!
- मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.