तुकडेबंदी कायद्याची जिल्हाभर जनजागृती करणार : चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/02/2026 12:37 PM

.कवठेमहांकाळ (ता. २४ फेब्रुवारी) येथे दुय्यम निबंधक कार्यालयात आज जयहिंद सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महत्त्वाचे निवेदन सादर केले. गुंठेवारी चळवळीचे जनक व जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख मा. चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील या निवेदनात तुकडेबंदी कायद्याची एसओपी नियमावली जनतेच्या माहितीसाठी तात्काळ कार्यालयाबाहेर फलकाद्वारे लावावी, अन्यथा रजिस्टर कार्यालयास टाळे ठोकणार.

निवेदनातील ठळक मागण्या:
- तुकडेबंदी कायद्याची (एसओपी) नियमावली : सर्वसामान्य जनतेला स्पष्ट माहिती मिळावी यासाठी कार्यालयाबाहेर फलक लावणे बंधनकारक करावे.  
- सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे : पारदर्शकता व सुरक्षिततेसाठी तातडीने कॅमेरे बसवावेत.  
- जनजागृती उपक्रम : कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत.  

जयहिंद सेनेने इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास संबंधित कार्यालयांना पक्षाच्या वतीने टाळे ठोकले जातील आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील.  

या वेळी शिष्ठामंडळात जयहिंद गुंठेवारी सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रामदास सावंत, तालुका अध्यक्ष आदर्श नलावडे, शहर प्रमुख श्री. सुनिल कांबळे, मिरज शहर प्रमुख हुसेनभाई शेख,मोहम्मद शिंदे, गौरव भोसले, मिलिंद पवार तसेच पदाधिकारी व मुद्रांक विक्रेते उपस्थित होते.  


Share

Other News

ताज्या बातम्या