भगूर नगर परिषदेचे सन 2026-27 साठी 69.45 कोटी इतक्या रकमेचे वार्षिक अंदाजपत्रक नगराध्यक्षा मा.प्रेरणा विशाल बलकवडे तथा विशेष सभेद्वारा मंजूर करण्यात आले.
सन 2026-27 साठी भगूर नगरपरिषद वार्षिक अंदाजपत्रकास मा.प्रेरणा विशाल बलकवडे नगराध्यक्षा तथा अध्यक्ष स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली .वार्षिक अंदाजपत्रकानुसार खर्च नगरपरिषद प्रशासन शहरातील नागरिकांसाठी आरोग्य सोयी सुविधा, दिव्यांगजन, महिला व बालक कल्याण व नगरपरिषद सफाई कामगार यांच्या राहणीमानात सुधारणा यांसाठी तरतूद करण्यात आली. तसेच नमो उद्यान ,दारणा नदी किनारी घाट, स्मशानभूमी ,वीर सावरकर उद्यान, शहरातील 24 तास पाणीपुरवठा योजना, रस्ते व भुयारी गटार, मल नि:स्सारण केंद्र यांसारख्या मोठ्या विकास योजनांवरती निधी खर्च करण्यास वार्षिक अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात आली
सन 2026-27 चे वार्षिक अंदाजपत्रक लेखा विभाग व मा. मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी तयार केलेले दिनांक 25/02/2026 रोजी स्थायी समिती समोर सकाळी १०:३० वाजता सादर केले त्यावर स्थायी समिती सदस्य माननीय प्रसाद आडके (उपनगराध्यक्ष तथा सभापती पाणीपुरवठा विभाग), मा. काकासाहेब देशमुख (सभापती बांधकाम विभाग), मा.सुधेश वालझाडे (सभापती स्वच्छता व आरोग्य समिती), मा.लता थापेकर (सभापती महिला व बाल कल्याण समिती) व मा.प्रेरणा विशाल बलकवडे नगराध्यक्षा, यांच्या समितीने चर्चेअंती विविध सुधारणा सुचवून अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान केली .
सदर अंदाजपत्रक दुपारी १२:०० वा विशेष सभेवरती मा. प्रेरणा विशाल बलकवडे नगराध्यक्षा यांच्यावतीने लेखाधिकारी सोमनाथ देवकाते व लेखापरीक्षक निखिल हांडोरे यांनी सभागृहात सविस्तर वाचन करून वार्षिक अंदाजपत्रक सादर केले. यावर प्रसाद आडके उपनगराध्यक्ष नगरसेवक मा. दीपक बलकवडे , काकासाहेब देशमुख यांनी विविध सूचनाअंती स्थायी समितीने मंजूर केलेले वार्षिक अंदाजपत्रक जसेच्या तसे विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले . सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये नगरपरिषद कर व करेतर उत्पन्न ,महसुली अनुदान व अंशदाने असे अंदाजे 8.97 कोटी महसुली जमा होईल सदर महसुलातून अंदाजे 8.73 कोटी इतका खर्च नगरपरिषद प्रशासन शहरातील नागरिकांसाठी आरोग्य सोयी सुविधा, दिव्यांगजन, महिला व बालक कल्याण व नगरपरिषद सफाई कामगार यांच्या राहणीमानात सुधारणा यांसाठी तरतूद करण्यात आली. तसेच शहरातील भांडवली विकास कामांसाठी 48.80 कोटी इतक्या निधी शासन स्तरावरून विविध विकासकामे राबविण्यासाठी प्राप्त करून घेण्यासाठी तरतूद करण्यात आली. तसेच सदर विकास कामांसाठी 55.60 कोटी इतका भांडवली निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे भगूर नगर परिषदेचे सन 2026-27 साठी 69.45 कोटी इतक्या रकमेचे वार्षिक अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.