मनपा आरोग्य व स्वच्छाता विभागाच्या कामकाजाचा विरोध पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी घेतला आढावा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/02/2026 12:42 PM


 मोकाट कुत्रे आणि डास निर्मूलन मोहिमेतील सद्यस्थितीची तपासणी; आरोग्य यंत्रणेला क्षेत्रीय पातळीवर सक्रिय राहण्याच्या सूचना

 सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता आणि नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते श्री. मंगेश चव्हाण व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य विभागाची विशेष आढावा बैठक पार पडली. 

या बैठकीत प्रामुख्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि शहरात सुरू असलेल्या औषध फवारणीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस महापालिका उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता), मुख्य स्वच्छता अधिकारी, स्वच्छता अधिकारी आणि सर्व प्रभागांचे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.


 आढावा बैठकीतील प्रमुख मुद्दे:

*शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या उपयायोजनांची माहिती श्री. चव्हाण यांनी घेतली.

 *   डॉग पॉन्डमध्ये सुरू असलेल्या निर्बीजीकरण कामाचा वेग आणि तेथील डॉक्टरांची उपलब्धता यांचा आढावा घेण्यात आला. कुत्रे पकडण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या गाड्या आणि पथकांच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली.

 *  मिरज आणि कुपवाड भागातील तक्रारींचा आढावा घेऊन, त्या भागातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

*डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या वॉर्ड स्तरावर सुरू असलेल्या धडक मोहिमेची माहिती यावेळी घेण्यात आली.

 * यंत्रणेची कार्यक्षमता: शहरात उपलब्ध असलेले १८ ट्रॅक्टर आणि फॉगिंग मशीन्स सध्या कोणत्या प्रभागांत कार्यरत आहेत, याची पडताळणी करण्यात आली. फवारणीची कामे वेळेत पूर्ण होत आहेत की नाही, याचा आढावा घेत असतानाच कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या समन्वयावर चर्चा झाली.

 * क्षेत्रीय कर्मचारी उपस्थिती: मुंबई-पुणे शहरांच्या धर्तीवर  निकषानुसार सद्यस्थितीत किती मनुष्यबळ उपलब्ध आहे, याचा आढावा घेण्यात आला.

३. स्वच्छता कर्मचारी व प्रभागनिहाय आढावा:

 * सर्व प्रभागांमध्ये सध्या किती स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांच्या हजेरीची काय स्थिती आहे, याची माहिती श्री. चव्हाण यांनी घेतली. ज्या प्रभागांत अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे, तेथील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

"नागरी तक्रारींचे निवारण हेच उद्दिष्ट" – मंगेश चव्हाण

बैठकीचा समारोप करताना विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी प्रशासनास मार्गदर्शन केले. ते म्हणाले,
> "आरोग्य व स्वच्छता विभाग ही शहरासाठी सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असो किंवा औषध फवारणी, नागरिकांना या सेवांचा लाभ प्रत्यक्ष जमिनीवर दिसणे आवश्यक आहे. आजच्या आढाव्यावरून असे स्पष्ट होते की, प्रशासनाने क्षेत्रीय पातळीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सर्व स्वच्छता निरीक्षकांनी आपल्या प्रभागातील कामाचा दैनंदिन अहवाल अद्ययावत ठेवून नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे."
प्रशासनाच्या वतीने आरोग्य व स्वच्छता विभागाने मांडलेल्या सर्व तांत्रिक मुद्द्यांची नोंद घेण्यात आली असून, कामकाजात सुधारणा करण्याची ग्वाही देण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या