'स्वारातीम' विद्यापीठात गुणवंत खेळाडू व समिती सदस्यांचा सन्मान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/02/2026 8:56 PM

नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दिनांक २४ फेब्रुवारी रोजी अधिसभा सभागृह मध्ये राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा भव्य गौरव सोहळा पार पडला. साउथ-वेस्ट विभागीय, पश्चिम विभागीय तसेच ऑल इंडिया आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विविध पारितोषिके मिळवून देणाऱ्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना व संघ व्यवस्थापकांना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
याच सोहळ्यात नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०२५ च्या आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या विविध समित्यांच्या प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला.
विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, डॉ. सुर्यकांत जोगदंड, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने यांच्यासह अधिसभा सदस्य डॉ. महेश बेंबडे उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्युडो, तलवारबाजी, तायक्वांदो, टेबल टेनिस, खो-खो, कबड्डी आणि बास्केटबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवणाऱ्या ओम हिंगमिरे, ज्ञानेश्वरी शिंदे, स्वप्नाली घेमुंड, प्रणव अडबलवार, अमिष आठवले, आयुष आठवले, कैवल्य गिरगावकर, तुषार जाधव, ओमकार बारहाते, रामचंद्र झोरे, शुभम थोरात, शुभम उत्तेकर, ओमकार सोनवणे, निहार दुबे, सौरभ अडवकर, संकेत सुपेकर, प्रेम रणदिवे, नितीन खटिंग, शुभम शिगवण, सोफिया शेख, अनिकेत चीद्रावार, ज्ञानेश्वर कावळे, गजानन भालटकर, गणेश कचकुळे, दत्ता शिंदे, सागर गायकवाड, आकांक्षा राठोड, गौरी दाहे, आरती शहा, प्रेक्षा पाटील, अमृता दिवसे, अनुराधा जाधव, अरुणा पोवार, प्राची लोहार, सानिका पाटील, सानिका संजय पाटील, संध्या पिंपळे, गीता तुरे, प्रगती कांबळे, साक्षी समसापुरे, कांचन सूर्यवंशी, मुक्ताई राऊत, नम्रता पवार, वैष्णवी जाधव, राधा कांबळे, प्रीती धनगेर, साधना पवार, प्रांजल मुगळे, ज्योती पवार, लक्ष्मी राठोड, सपना पैठणे, राजेश्वरी वाघमारे, गायत्री वाघ आणि पल्लवी पुतळे या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. तसेच संबंधित प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांनाही गौरविण्यात आले.
याप्रसंगी डॉ. महेश वाकरडकर, डॉ. मीनानाथ खोमचाळे, डॉ. तातेराव केंद्रे, डॉ. सचिन चामले, डॉ. पवन पाटील, डॉ. अशोक वाघमारे यांच्यासह अनेक प्राचार्य व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील वाढत्या यशाचा गौरवशाली टप्पा ठरला.

Share

Other News

ताज्या बातम्या