मनपा कर्मचाऱ्यांसाठी युनिक इन्सिट्युट ऑफ क्रीटीकल केअर अंतर्गत विशेष आरोग्य शिबिर उपक्रम कौतुकास्पद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/02/2026 3:51 PM

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व स्वच्छता कामगारांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात UICC तर्फे कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य सवलती जाहीर करण्यात आल्या. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीद्वारे विविध आजारांचे लवकर निदान व्हावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश होता.

या शिबिरात एकूण ११७ कर्मचारी व कामगारांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.

🩺 तज्ज्ञ वैद्यकीय पथक:
• डॉ. परमशेट्टी
• डॉ. रियाज मुजावर
• डॉ. राजीव गांधी
• डॉ. टकले
* डाॅ प्राची प्राणी 
* डाॅ. सुरज तांबोळी 

या प्रसंगी महापौर धिरज सुर्यवंशी उपमहापौर गजानन मगदूम ,आयुक्त सत्यम गांधी सभागृह नेते संदिप आवटी उपायुक्त स्मृती पाटील प्रभाग ७ चे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी मिरज शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डाॅक्टर व कर्मचारी उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या