ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोराडी प्रकल्पावरील घटना 'गड आला पण, सिंह गेला'


  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 9/22/2020 5:30:42 PM

कोराडी प्रकल्पावरील घटना
'गड आला पण, सिंह गेला'
सांडव्यात वाहून गेलेल्या पाचही युवकांना सुखरुप वाचविण्याची मोहिमी
यशस्वीपणे पार पडली. पाचणी जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले परंतु या
मोहीमेत दुर्दैवाने विजय सुरुशे यांचा अंत झाला. त्यामुळे देऊळगाव माळी गावावर
शोककळा पसरली आहे. 'गड आला पण, सिंह गेला' अशी भावना गावकऱ्यांनी
व्यक्त केली आहे. विजय सुरुशे हे कुस्ती पहेलवान होते तसेच पोहण्यातही तरबेज
होते. त्यांच्या कंबरेला दोरी बांधलेली असल्याने ही दोरी झाडात अडकली आणि
त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा घात झाला, दोरी बांधलेली नसती तर
त्यांचे प्राण वाचले असते, असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,
दोन मुले, आई, वडिल व भाऊ असा मोठा परिवार आहे.

Share

Other News