राणाप्रताप मंडळ, कुपवाडचा खेळाडू अक्षय मासाळ यास सिनिअर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत रौप्य पदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/01/2026 12:30 PM

कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाचा अष्टपैलू  खेळाडू अक्षय मासाळ यास तेलंगना येथे झालेल्या सिनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत रौप्यपदक मिळाले.
        तेलंगना येथे 58 वी  सिनियर राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून अक्षय मासाळ खेळताना सर्वोतम खेळ केला.रेल्वे संघाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाला पराभव स्वीकारावा लागूण रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
            या पूर्वी अक्षय मासाळ हा दिल्ली,गोवा,गुजरात, ओडीसा, धाराशिव येथे झालेल्या 3 सिनियर राष्ट्रीय स्पर्धेत व 2 नॅशनल गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघांकडून खेळलेला आहे. हि त्याची चौथी सिनियर राष्ट्रीय स्पर्धा होती. या स्पर्धेत अक्षयने उत्कृष्ट खेळ करत महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
  अक्षय मासाळ यास राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील,रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे,प्रा.सचिन चव्हाण, संजय हिरेकुर्ब, विशाल बन्ने, शितल कर्नाळे, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,महेश कर्नाळे,अतुल पाटील,  शेखर स्वामी, धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, वासुदेव जमदाडे,दिपक पाडळे,स्वप्नील पाटील आंदिचे मार्गदर्शन मिळत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या