नांदेड : महापालिका निवडणुकीसाठी नागरिकांमध्ये मतदानाबद्दल उत्सुकता वाढून शंभर टक्के मतदान व्हावे, यासाठी जागृती करण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या वतीने मुख्य कार्यालयात 'मी मतदान करणारच' ह्या 'मतदान संकल्प सेल्फी पॉइंट' चे उदघाटन *मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर* यांच्या हस्ते करण्यात आले.
*मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या संकल्पेतून हा सेल्फी पॉइंट साकरण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत पालिका प्रशासन मतदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवत आहे. राज्य घटनेने सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देऊन एक महत्वाचे शस्त्र हातात दिले आहे. या शस्त्राचा वापर करुन मतदान करणे आवश्यक आहे. नगर शहरातून योग्य उमेदवार निवडला जावा, यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन समस्या जाणणारा, कार्यक्षम, उत्साही व समाजसेवक नगरसेवक निवडला जावा, यासाठी शंभर टक्के मतदान करणे गरजेचे आहे. एक सुज्ञ मतदार या नात्याने मतदानाच्या दिवशी कुठेही सहलीला न जाता किंवा मतदानास टाळाटाळ न करता आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुध्दा मतदानासाठी जागरुकता निर्माण होण्यासाठी सदरील उपक्रम स्तुत्य असुन निवडणुकीच्या माध्यमातुन देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मतदारांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे, भारत देशामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असुन या व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी नागरीकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन यावेळी *मुख्य निवडणूक निरीक्षक नतिशा माथूर* यांनी केले.
याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निरीक्षक महेद्रकुमार कांबळे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त नितीन गाढवे, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, दिलीप टाकळीकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, शिक्षणधिकारी नागराज बनसोडे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, भांडारपाल नागनाथ पतंगे, स्विय सहाय्यक महेश आसणे व इतर कर्मचारी उपस्थित होते.