नागपूर : हिवाळी अधिवेशनात कांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मोठी दाद मिळाली. चाळीत सडलेल्या किंवा खराब झालेल्या कांद्याच्या नुकसानीसाठी नियमांमध्ये तरतूद नसली तरी राज्य सरकारने केंद्राकडे ‘एनडीआरएफ’ला विशेष प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त मदतीची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली.
मंत्री पाटील यांनी सांगितले की—
🔹 राज्यातील २.४९ लाख हेक्टर कांदा पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी ₹१७,००० मदत वितरित.
🔹 शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तीन हेक्टरपर्यंत नुकसानभरपाईचा निर्णय; बहुतेकांना मदत पोहोचली.
🔹 रब्बी हंगामातील नुकसानीवर हेक्टरी ₹१०,००० मदत जाहीर.
🔹 प्रथमच विहिरींच्या नुकसानीसाठी प्रति विहीर ₹३०,००० मदत; आतापर्यंत ११,००० विहिरींना ₹३५ कोटी वितरित.
कांदा पिकावरील धोरणासाठी पाशा पटेल समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.