नांदेड पोलीस दलातर्फे बालकल्याण पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण घेवुन बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत बालविवाह प्रतिबंध घेण्यात आली प्रतिज्ञा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/12/2025 6:57 PM

नांदेड :- मा. अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाकडून दिलेल्या सुचनेप्रमाणे आज दिनांक 11/12/2025 रोजी 12.00 वाजता मंथन हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे विधीसंघर्षग्रस्त बालक काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांना योग्य त्या संवेदनशिलतेने हाताळण्यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन मधील विशेष बाल पोलीस पथकात काम करणारे अधिकारी व अमंलदार तसेच बालकल्याण पोलीस अधिकारी यांचे नियमीत व अद्ययावत प्रशिक्षण होणे फार गरजेचे असल्याने बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत यंत्रणा सक्षम, प्रशिक्षीत व प्रभावी करण्यासाठी प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षणामध्ये बालकल्याण समितीचे अध्यक्ष श्री राजवंतसिंघ यांनी (SJPU) विशेष पोलीस बाल पथके व विशेष बाल कल्याण पोलीस अधिकारी यांच्या कामकाजाबाबत सविस्तर माहीती देवुन मागदर्शन केले. बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे मॅडम यांनी बाल विवाह प्रतिबंध अधिनियमावर मार्गदर्शन करुन बालविवाह बाबत पोलीसांची भुमीका सांगीतल्या तसेच अॅङ सोनकांबळे यांनी बालकांचे लैगिंक अत्याचार प्रतिबंध अधिनियमावर सखोल मार्गदर्शन केले आहे.

सदर प्रशिक्षणा दरम्यान मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्रशिक्षणास हजर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत बालविवाह निर्मुलनाची शपथ दिली. यावेळी जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण संस्थचे निलेश कुलकर्णी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तत्पुर्वी प्रशिक्षण व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा पि. डहाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर प्रक्षिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाचे अच्युत मोरे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या