*कोल्हापुर - मिरज - कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस धावते तिन ते साडेतिन तास उशीरा*
*प्रवांशात व भाविकांत नाराजीचा सुर*
*गाडी वेळेत व कलबुर्गी हुन रात्री सोडण्याची मागणी*
कोल्हापूर मिरज कलबुर्गी मार्गावर नुकतीच सकाळच्या सत्रामध्ये धावणारी गाडी क्र. 01451/52 कोल्हापूर - मिरज - कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस सुरू करण्यात आली.
सकाळच्या सत्रामध्ये रेल्वे सुरू झाल्यामुळे पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर व तुळजापूर या धार्मिक स्थळांची दर्शन यात्रेकरिता भाविकांना सोयीची व उपयुक्त अशी गाडी सुरू झालेली आहे.
यामुळे येणाऱ्या दिवाळी निमित्त देवदर्शन यात्रा करणाऱ्या भाविकांची उत्तम सोय झालेली आहे.या गाडीचा स्पेशल दर्जा असल्याने दर ही वाढीव आहेत.तरीही प्रवासी व भाविकांची या गाडीला पसंदी आहे.
परंतु या गाडी चे वेळापत्रक पाहिले असता या गाडीसाठी लुज टाइमिंग भरपूर प्रमाणात देण्यात आलेला आहे. तरीही ही गाडी 24 सप्टेंबर पासून सुरू झालेले असून ही गाडी आज तागायत सुमारे तीन ते साडेतीन तास उशिराने धावते.प्रवासात ही गाडी मध्येच एखाद्या स्थानकावर तासनतास थांबवुन ठेवली जाते.
यामुळे प्रवाशांनी व भाविकांनी केलेले नियोजन विसकळते व नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे तरी या गाडीचा लूज टाइमिंग कमी करून सकाळच्या सत्रातील कोल्हापूर कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस वेळेवर पोहोचवण्यात यावी व प्रतीच्या प्रवासासाठी कलबुर्गी येथून रात्री उशिरा नऊ वाजता सोडण्यात यावी अशी मागणी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, सोपान भोरावत, वाय. सी कुलकर्णी, मधुकर साळुंखे यांनी केली आहे