सांगली: दि. ९,
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या दृष्टीने नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने (रा.नि.आ.) मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या भौगोलिक सीमा, नकाशे व विस्ताराची माहिती शुक्रवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी नागरिकांच्या माहितीसाठी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी यासंबंधीची सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
👉 अंतिम प्रभाग रचना पाहण्याची ठिकाणे:
नागरिकांना अंतिम प्रभाग रचनेची माहिती परिशिष्ट १४ व १५ मध्ये खालील ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध असेल:
• महानगरपालिका मुख्यालय: राजवाडा चौक, सांगली येथील मनपा मुख्य कार्यालयाचे नोटीस बोर्ड.
• सर्व प्रभाग समित्या: महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांच्या नोटीस बोर्डवर.
• मनपा संकेतस्थळ: महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर — www.smkc.gov.in