कोल्हापूर रोड आकाशवाणी केंद्र समोर मुरूम टाकला आहे मात्र पाणी काढण्यासाठी कोणतीही वाट केल्या नसल्यामुळे मुरमाचा चिखल होऊन मोटरसायकल मध्ये अडकून गाड्या मोठ्या प्रमाणात अपघात होऊन पडत आहेत आगीतून उठून फुफाट्यात पडणे ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण बघायचं असेल तर सांगली जिल्ह्यातील तमाम शाळकरी विद्यार्थी असतील कॉलेजचे विद्यार्थी असतील यांच्या सहली कोल्हापूर रोडच्या कामावर घेऊन याव्यात असे आवाहन सर्व पक्ष कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे परवा मुरूम टाकल्यानंतर आम्ही थांबून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या सदर पाणी काढण्यासाठी जेसीबीने चर काढा एका बाजूला काढतो म्हणून सांगितले मात्र तो जेसीबी कुठे गेला अधिकारी कुठे गेले हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित जपान मधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर यांना प्राचारण करावे लागेल असे वाटते कारण या रस्त्याचे शुक्ल कास्ट काय थांबायचे नाव घेत नाही महापालिका आयुक्त महावितरणचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कोल्हापूर रोडचे रहिवासी यांची व्यापक मीटिंग घेऊन मार्ग काढता येतो मात्र यांना मीटिंग घ्यायला काय अडचण आहे का सर्व पक्षी कृती समितीच्या सदस्यांना याची क्रेडिट मिळेल याची भीती वाटते असंच आता नाईलाजाने म्हणावे लागत....