भगूर नगरपरिषद शताब्दी महोत्सव उद्घाटन रॅली उत्साहात पार

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/10/2025 10:51 PM

भगूर नगरपरिषद शताब्दी महोत्सव  उद्घाटन रॅली उत्साहात पार
भगूर │ भगूर नगरपरिषद स्थापनेला यंदा १ ऑक्टोबर २०२५ रोजी  शंभर वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी महोत्सवानिमित्त  भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भगूर नगरपरिषद शताब्दी सोहळा अंतर्गत आयोजित रॅलीचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले आहे. नगरपरिषदेने शंभर वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करत नागरिकांना एकत्र आणणारा हा भव्य सोहळा आयोजित केला.सदर शताब्दी महोत्सव  उद्घाटन रॅली कार्यक्रमासाठी मा.श्रीमती.अर्पिता ठुबे ,उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी ,उपविभाग नाशिक ,मा.शाम गोसावी सह-आयुक्त (न.वि.शाखा) जिल्हाधिकारी नाशिक, माजी मुख्याधिकारी भगूर नगरपरिषद  निर्मला गायकवाड (सहायक आयुक्त ,जळगाव महानगरपालिका ) हे सर्व प्रमुख अतिथी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापुरुषाना उपस्थित प्रमुख अतिथीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच दीपप्रज्वलन करून झाली.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी भगूर शहराचा नगरपरिषद माध्यमातून शताब्दी कारकिर्दीत झालेला विकास तसेच उल्लेखनीय कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला भगूर नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष ,नगरसेवक व नगरसेविका यांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार प्रमुख अतिथी व मा.मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला .
प्रमुख अतिथी मनोगतातून मा.शाम गोसावी, मा.निर्मला गायकवाड यांनी शताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा भगूर नागरिकांना दिल्या .
रॅलीची सुरुवात मा.श्रीमती.अर्पिता ठुबे यांच्या हस्ते फीत कापून  शिवाजी चौकातून झाली. विद्यार्थी, नगरसेवक, अधिकारी, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लेझीम, ढोल-ताशा, पताका व घोषवाक्यांनी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
या रॅलीतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, नागरिक कर्तव्य आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला. रॅलीचा समारोप ऐतिहासिक किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.
कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी सर्व माजी नगराध्यक्ष ,नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते .भगूर नगरपरिषद अधिकारी , कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी , नगर अभियंता सिद्धेश मुळे ,पाणीपुरवठा अभियंता स्वप्नील मोकळ ,संगणक अभियंता रोहित सुरसे , नगर रचनाकार रोशन उगले ,लेखापाल सोमनाथ देवकाते ,लेखापरीक्षक निखील हंडोरे ,अस्थापना प्रमुख गीतांजली मराडे ,मिळकत विभाग प्रमुख सोनाली शिरसाठ , चित्रा भवरे सहायक प्रकल्प अधिकारी, पूनम गवळी ,पुरुषोत्तम कुटे ,मितेश कंडारे ,दिलीप वाघ ,शशांक तिवडे ,मंगल बागुल ,अलका देवगिरे ,सूर्यभान झाल्टे,सोनवने ,रवी संसारे ,संतोष कासार ,सर्व विभाग कर्मचारी ,सफाई कर्मचारी ,माजी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे. तसेच पत्रकार ,शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते ,शिक्षक व सर्व विद्यार्थी विशेष वेशभूषासह उपस्थित होते .शहरातील सर्व नागरिक ,ज्येष्ठ नागरिकमंच अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते .

Share

Other News

ताज्या बातम्या