जयहिंद सेनेकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार, तुकडे बंदी कायद्यातील त्रुटी दूर करण्याचेही दिले आश्वासन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/07/2025 2:59 PM

मुंबई ता. १४ जुलै २०२५ | तुकडे बंदी कायदा शहरी भागासाठी रद्द केला यासाठी जयहिंद सेने कडून महसूल मंत्र्याचे अभिनंदन.. तसेच शासन आदेश परीत व्हायच्या अगोदरच त्रुटी दुर कराव्यात यासाठी जयहिंद सेनेला पुढील आठवड्यात बैठक घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी दुरुस्त्या केल्या जातील असे महसूल मंत्री मा चंद्रशेखर बावनकुळे यांनी जय हिंद सेना पक्ष प्रमुख चंदनदादा चव्हाण यांना दिले. शिष्ट मंडळात सातारचे उपजिल्हा प्रमुख सोमनाथ काळकुटे पाटील, मिरज शहर प्रमुख हुसेन शेख उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तूकडे जोड तूकडे बंदी कायदा रद्द केला. याचा फायदा ग्रामीण भागाला ही व्हावा.१ जानेवारी २०२५ पर्यन्त काल मर्यादा साठी या बाबत शासन आदेश पारित करत असताना जनते मध्ये खरेदी दस्त ऐवज होताना दुय्यम निबंधक यांना नोंदणी व मुद्रांक अधिनियम १९०८ चे कलम १८ मध्ये मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात या मध्ये पोटदुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पोट दुरूस्ती कलम १८ अ समाविष्ट करण्यात आले आहे. एक ते दहा गुंठे पर्यन्त खरेदी करताना त्यामध्ये पोट दुरूस्ती झाल्याने नागरिकांना दुय्यम निबंधक खरेदी दस्त करून देणार नाहीत .त्यासाठी शासन आदेश पारित करताना या पोट दुरुस्तीचा अडसर दूर करावा तसेच त्यामध्ये त्यांच्या मिळकती कायदेशीर व्हाव्यात यासाठी अटी शर्ती घालण्यात याव्यात तरच गुंठेवारी धारकांना याचा लाभ घेता येईल अशी तरतूद करण्यात यावी .

आपल्या राज्यात अर्ध्या गुंठया पासून ते दहा गुंठया पर्यंत यापूर्वी करारपत्र साठेखत, मुखत्यारपत्र आदी नागरिकांनी करून ठेवलेले आहेत असे लोक त्यांची खरेदी व्हावी या अपेक्षेत आहेत. अशी मागणी करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या