सांगली सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील त्रिकोण बागेची सध्या दुरावस्था झाली असून,याकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सदर बागेत अनेक जेष्ठ नागरिक सकाळी फिरण्यासाठी,तसेच व्यायामासाठी येत असतात.परंतु याठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढलेला आहे, बागेला सुरक्षा रक्षक नाही, बागेच्या आत टू व्हीलर गाड्यांचे पार्किंग करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे इथे येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या त्रिकोणी बागेकडे महानगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष घालणे जरुरीचे आहे.याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमवा, आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळवी.ही विनंती!
*मनोज भिसे-अध्यक्ष लोकहित मंच, सांगली*