सांगली :- सांगली शहरात नव्यानेच निर्माण होत असलेल्या भव्य अशा ३२ गुंठे जागेवर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्याचे काम सुरु असुन नुकतीच या कामाची पहाणी केंद्रीय मंत्री मा.ना.रामदास आठवले यांनी केली. माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे,माजी सभापती विरेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून सांस्कृतिक भवन निर्माणाचे काम प्रगतीपथावर असून माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या निधीतून रु.२५ लक्ष मंजूर करण्यात आले होते शिवाय माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील तसेच तात्कालीन स्थायी समिती सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी रु.५० लक्ष मंजूर करून वाॅलकपौंडचे काम सुरु केले होते सदरचे काम पूर्णत्वास येत असुन माजी सभापती विरेंद्र थोरात तसेच माजी सभापती स्नेहलताई सावंत यांच्या प्रयत्नातून उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार यांनी मंजूर केलेल्या रु.१ कोटी निधीतून सभागृह निर्माणाचे काम सुरु असलेची माहिती यावेळी उपस्थित शहर अभियंता मा.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.उर्वरित कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही यासाठी मी प्रयत्नशील आहे असे आश्वासन ना.आठवले यांनी यावेळी बोलताना दिले.मे.पिनाका कन्सल्टींचे संचालक आर्किटेक्ट सतीश कमाने यांनी
नियोजित आराखड्याची माहिती यावेळी मंत्री महोदयांना दिली.
यावेळी जगन्नाथ ठोकळे,विरेंद्र थोरात,संतोष पाटील, श्र्वेतपद्म कांबळे,विक्रमसिंह मोहिते,आशिष उर्फ मनोज गाडे,अरुण आठवले,सौ.छायाताई सरवदे
यांचेसहीत अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.