समाज हितासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा : युवराज शिंदे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/04/2025 8:38 AM

     संगणकाच्या युगामध्ये संकुचित वृत्ती फोफावत आहे. हे समाज हितासाठी घातक आहे. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये बंधुभाव जोपासला जातो. शाळा, कॉलेज मध्ये तरुणांना मिळणाऱ्या शिक्षणातून त्यांना समाजसेवा करण्याचे विचार येतात. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित असते. तरच आपली संस्कृती टिकेल आणि आपल्या राज्याचा, देशाचा विकास होईल त्यासाठी तरुणांची योगदान महत्त्वाचे आहे. असे मत युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी पानपोईच्या शुभारंभ प्रसंगी काढले. 
    32 युथ फाऊंडेशनच्या वतीने विश्रामबाग चौकामध्ये पाणपोईचा उपक्रम चालू करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रज्वल मिरजे, उपाध्यक्ष अमृत मदार ,
शिवराज शिंदे, खजिनदार 
आदर्श वडगावे, सचिव 
 पैलवान उपसचिव 
मुजीफ भालदार, उपसचिव 
अभिषेक पाटील, उपसचिव अजित शेख ,आदित्य सनदी, आदित्य कांबळे ,निखिल मालगे शिवराज वाघमोडे प्रणव संकपाळ यश मणके हर्षवर्धन जाधव अफान मुजावर विक्रम माने पृथ्वीराज हर्षवर्धन अथर्व वाघमोडे कुणाल पाटील निहालदाफ प्रतीक कांबळे  वीर जय प्रथमेश कुंभार प्रणय पाटील अविष्कार पाटील आदर्श पाटील दर्शन लांडे ओमकार चव्हाण वैष्णव चौगुले यश धोत्रे हर्षद काटे स्वयम वानगुडे रोहन दबडे अमोल मदने व इतर सर्व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या