*ति. झं. विद्यमंदिरात क्रीडा पारितोषिक मोठ्या उत्साहात संपन्न* .

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/12/2024 4:46 PM

*ति. झं. विद्यमंदिरात क्रीडा पारितोषिक मोठ्या उत्साहात संपन्न* .
(भगूर वार्ताहर) 

ना. ए. सोसायटी संचलित ति. झं.  विद्यामंदिर भगूर शाळेत वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ 2024 मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी  मा. श्री. अरुण चव्हाण हे उपस्थित होते , यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विश्वास बोडके हे उपस्थित होते , त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र मोहिते यांनी केले . यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना आडके , पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. रुपाली उचाडे, पालक शिक्षक संघाचे सदस्य भास्कर भदाणे , शालेय पंतप्रधान आरती निर्भवणे हे उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय श्री. रविंद्र नाकील, यांनी करून दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. हेमंत काशीकर यांनी केले. पारितोषिक निवेदन व यादी वाचन श्री. संदिप पाटील व श्रीमती.  माया सिसोदे यांनी केले. श्री. कैलास टोपले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते . श्रीमती उषा आव्हाड, सौ. विजया चतुर , श्री. महाजन सर, श्री. कुंदन गवळी, श्री. विलास कडाळे, श्री. सुनील शेटे, श्री. दिगंबर माळी, श्री. चीमा सापटे, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Share

Other News

ताज्या बातम्या