जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 03/09/2024 8:27 PM



गडचिरोली दि.३: जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार अर्ज व निवेदन सादर करण्यासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी तळमजल्यावर दिव्यांग अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी संजय दैने यांनी  दिव्यांग व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून सदर कक्ष  स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लिफ्ट मशीनचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होईपर्यंत दिव्यांग अभ्यागत कक्ष तळमजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या समोरील कक्षात स्थापन करण्यात आला असून या कक्षाचे नोडल अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार अमोल गव्हारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
०००

Share

Other News

ताज्या बातम्या