काल शामराव नगर कोल्हापूर रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून CYL या फॅशन मार्केटिंग कंपनी विरोधात आंदोलन केले. पोस्ट लिहण्याचे कारण हे आहे की वेगवेगळ्या पक्ष संघटना अंतर्गत काम करणारी आम्ही सारी मंडळी पण सांगलीच्या विद्यार्थी युवक हितासाठी एकत्रित आलो आणि लढलो ही भावलेली गोष्ट.
काल कोल्हापूर रोड येथे CYL FASHION MARKET Pvt Ltd. कंपनी नावे असलेल्या कंपनी तर्फे अनेकांना फसवणूक करण्यात आले आहे.. कंपनित नोकरी जॉब सेल मार्केटिंग करण्यासाठी प्रत्येकी 50000 रुपये भरून फसवणुकीचा प्रकार समोर येत आहे.. कंपनीद्वारे आजपर्यंत करोडो रूपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले..
कंपनी विरोधात सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला . कंपनीद्वारे फसवणूक झाल्या प्रकरणी इम्रान पेंढारी (पेठ वडगाव) गणेश मंडले (भिवघाट) फिरोज पेंढारी (रूकडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे..
यावेळी मी स्वतः आणि सोबतच रजाक भाई नाईक, संदीप दळवी, आनंद देसाई,सलीम पन्हाळकर, उदय भडेकर, पत्रकार इकबाल मुल्ला, रोहित जगदाळे, रोहित बाबर, राजू नलवडे, जोतिराम वाजे, दिनेश बाबर, प्रतीक राजमाने, शाम शिकलगार हे असे सारेच जन एकत्रित लढलो आणि सदर बोगस कंपनी विरोधात कारवाई साठी पोलीस प्रशासनाला भाग पाडले.
ही एकी हे असंच संघटन माझ्या सांगलीसाठी माझ्या लोकांसाठी बॅनर न बघता मी कायम पुढाकार घेऊन लढेल, चांगल्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सोबत असेल एवढं निश्चितच....
* मा नगरसेवक
अभिजित भोसले