पै. महेंद्र गायकवाड ठरला मानदेश केशरीचा मानकरी

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 23/07/2024 9:27 AM

 


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे )

अभयसिंह जगताप यांच्या जन्मदिनी आयोजित माणदेश केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात  

मसवड दि:कुस्ती शौकिनांनी भरलेले मैदान, व्यासपीठावर मान्यवरांची तुफान गर्दी  अशा जबरदस्त वातावरणात रात्रीच्या पावणेअकरा वाजता पैलवान महेंद्र गायकवाड याने पैलवान बाला रफिक शेख याला आसमान दाखवत सहा लाख रुपयांचे इनाम जिंकले. 
महिला माणदेश केसरी किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै. वेदांतिका पवार विरुध्द राष्ट्रीय पदक विजेती पै. सानिका पवार यांच्यात झालेली लढत दोघींचा कस पाहणारी ठरली. सरतेशेवटी गुणांवर या कुस्तीचा निकाल देण्यात आला. यात पै. वेदांतिका पवार महिला माणदेश केसरीची मानकरी ठरली.

अभयदादा कुस्ती प्रेमी संघटना माण तालुका, तसेच वरकुटे-मलवडी येथील विविध संघटनांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार २१ जुलै जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानास कुस्ती शौकिनांचे तुफान प्रतिसाद मिळाला.

या कुस्ती मैदानात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुभाष नरळे, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे, नितीन राजगे, बाळासाहेब काळे, सागर पोळ, अंगराज कट्टे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती.

पै. किरण भगत याने पै. संदीप बडवान याला एकचाक डावावर चितपट करुन पाच लाखांचे इनाम जिंकले. पै. माऊली कोकाटे याने पै. बिन्ना कुमारला तर पै. हर्षवर्धन सदगीरवर याने पै. पृथ्वीराज पाटील याला पराभूत करुन प्रत्येकी चार लाखांचे इनाम जिंकले. पै. अमोल नरळे याने पै. अविनाश पाटील याच्यावर विजय मिळवून तीन लाखांचे तर पै. गणेश कुंकुले याने पै. शुभम सिदनाळे यास पराभूत करुन दोन लाखांचे इनाम जिंकले. तर पै. मनिष बनगर याने पै. सुरज धायगुडे यास आसमान दाखविले. पै. देवा थापा विरुध्द पै. रवी कुमार या मनोरंजक कुस्तीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. यासोबतच हजारो रुपये इनामाच्या चटकदार कुस्त्या मैदानात झाल्या.
.........
चौकट : युवा नेते ऋषिकेश जगताप याचे नेटके नियोजन

माण पंचायत समितीचे माजी उपसभापती कै. वसंतराव जगताप यांचे सुपुत्र व अभयसिंह जगताप यांचे पुतणे युवा नेते ऋषिकेश जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत या मैदानाचे अतिशय नेटके नियोजन केले होते. उपस्थित सर्वच मान्यवरांनी उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचे कौतुक केले.
.........
अभयसिंह जगताप यांनी माण तालुक्यातील गावोगावच्या तालीम व पैलवान यांची माहिती संकलित करुन पैलवानांना ओळखपत्र देण्यात येतील असे सांगितले. तसेच पैलवानांना दरमहा मानधन व अपघात विमा योजना देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. पैलवानांसाठी विविध योजना राबविण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.


चौकट....
खा. धैर्यशील  मोहिते पाटील बोलताना म्हणाले की,इथल्या लोकप्रतिनिधीला 
पंधरा वर्षात एक क्रीडा संकुल उभा करता आले नाही. आश्वासनांचा पाऊस पडतात आता इथून पुढे माण मध्ये नुरा कुस्ती चालणार नाही. आता येथून पुढे माण खटावमध्ये मी लक्ष देणार आहे 
        अभयसिंह जगताप यांनी माझ्यावर जे उपकार केले त्याची मी परतफेड नक्की करेन आणि सर्वांनुमते जो उमेदवार विधानसभेला असेल त्याला निवडून आणायची जबाबदारी आता माझ्यावरती आहे, अभयसिंह जगताप हे तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी कायमच उभा राहील असे उदगार त्यांनी काढले.

Share

Other News

ताज्या बातम्या