सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांच्या पुढाकारातून आरमोरीत दिव्यांग शिबिर

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 22/02/2024 7:20 AM



 

शिबिरात २६१ दिव्यांगाची झाली तपासणी
 
प्रतिनिधी गडचिरोली:प्रशांत पेदापल्लीवार

आरमोरी:-

 तालुका प्रशासनाचे वतीने उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दिव्याग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात आले.सदर शिबिरात तालुक्यातील ग्रामीण भागांतील २६१ दिव्यांग बांधवांनी शिबिरात सहभागी होऊन तपासणी करूण घेतली

भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय  परिविक्षाधीन अधिकारी ओमकार पवार हे आरमोरी येथे रूजू होताच त्यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे.  तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक दिव्यांग आहेत. मात्र त्यांच्याकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या आर्थिक लाभापासून ते वंचित आहेत. हि बाब भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ओमकार पवार यांच्या लक्षात आल्याने त्यानीं प्रत्येक गावागावात महसूल विभागाच्या वतीने तलाठी यांचे मार्फत सर्व्हे करूण तालुक्यातील दिव्यागं बांधवाची माहिती गोळा केली . जे दिव्यांग् असूनही ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही व जे शासनाच्या लाभापासून वंचित आहेत अशा गरीब गरजु दिव्यांगासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले.


दिव्यांग तपासणी  शिबिरात  कान नाक घसा तपासणी २८, अस्थिव्यंगरोग ८६, मानसिक रोग ४३, फिजीसियन तपासणी.. ३५, बालरोग १६, नेत्र तपासणी,३५, इतर रुग्ण १८ अशा एकुण २६१ दिव्यंगाची नोंदणी करूण तपासणी करण्यात आली व ५४ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली.


 सदर शिबिरात गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टराना बोलवण्यात आले. शिबिरात तालुक्यातील दिवांग बांधवाना महसूल प्रशासनाने शिबिरस्थळी आणून त्यांची तपासणी करून घेतली.
तपासणी केलेल्या दिव्यांगणा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. गरजू व गरीब दिव्यांगाना त्यांचे आवश्यक असलेले कागदपत्र महसूल प्रशासनाच्या वतीने काढून त्यांना शासनाच्या दिव्यांग योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

 शिबिराला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार, नायब तहसीलदार ललित लाडे, डी.एम वाकुलकर, मंडळ अधिकारी जि. एम. कुमरे, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील डॉ. नागदेवते, डॉ. मनोज मस्के, डॉ. प्रतीक चकोले डॉ. छाया उईके तसेच दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रमुख अनुप्रिया आत्राम व त्यांची वैद्यकीय चमू तसेच तालुक्यांतील तलाठी व तहसील कार्यालयाचे कर्मचारी कोतवाल उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या