नानेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी वासुदेव

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 12/02/2024 2:40 PM

नानेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी वासुदेव पोरजे यांची बिनविरोध
भगूर वार्ताहर:- नाशिक तालुक्यात राजकीय दृष्ट्या जागरूक असलेल्या नानेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी युवा नेते वासुदेव पोरजे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.रोटेशन पद्धत असल्याने सौ.भारतीताई शिंदे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदाच्या निवडीसाठी नानेगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वासुदेव पोरजे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वासुदेव पोरजे यांची  उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले यावेळी पोरजे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी,गुलालाची उधळण करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.याप्रसंगी सरपंच अशोक आडके,माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे,विलास आडके,प्रमोद आडके, ग्रा सदस्य संपत बर्डे,भारतीताई शिदे,आशा मोरे,वर्षा आडके,नंदा काळे,विमल आडके,अनिता आडके,पोलीस पाटील संदिप रोकडे,राजाराम शिंदे,सुनिल मोरे,संजय आडके,कैलास आडके,विजय आडके,भगवान आडके,राजाभाऊ शिंदे,नवनाथ शिंदे,संजय शिवाजी आडके,मनोहर सोनवणे,गोकुळ सोनवणे,अनिल पोरजे,संजय शिंदे,मोहन शिदे,अशोक दळवी,समाधान शिदे,विशाल शिदे,अमोल आडके,देवराम पोरजे,सहादु रोकडे,दिपक चव्हाण,वासुदेव आडके, भानुदास शिंदे,जगन शिंदे,मंगेश पोरजे,दत्तु शिंदे,कैलास काळे,संदिप काळे,सचिन भोर,दशरथ शिंदे आदीसह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या