कचरा सर्वजनिक ठिकाणी जाळणे ताबडतोब थांबवा अन्यथा आंदोलन,: नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/02/2024 1:15 PM

प्रति 
मा.आयुक्त 
     सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

विषय :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील कचरा जाळण्यात येत असले बाबत...

महोदय,

आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच भागात सकाळी कचरा गोळा करण्यात येतो व त्याच ठिकाणी वाहतूक करण्याचा त्रास नको म्हणून जागेवर पेठवण्यात येतो सरास ठिकाणी त्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात जाळण्यात येतात.
एका बाजूला हवेत प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात मात्र दुसऱ्या बाजूला अश्या पद्धतीने कचरा जाळण्यात येत आहे.
आज अमराई जवळ रतनशी नगर येथे अश्याच पद्धतीने कचरा जाळण्यात आला होता त्यातून मोठ्या प्रमाणात आग लागली होती त्यात एका पाईप व्यापारी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याला जबाबदार कोण
तसेच आकाशवाणी ,शामराव नगर खिलारे कार्यालय जवळ सुधा रोज सकाळी अश्याच पद्धतीने कचरा जाळण्यात येत आहे त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना श्वासास्वासाचे त्रास होत आहेत ह्याला जबाबदार कोण
मनपा आरोग्य अधिकारी एस आय मुकादम नेमके काय काम करतात याची चौकशी करून कचरा जाळण्याचे प्रकार चाललेले आहेत ते ताबडतोब थांबविण्यात यावेत अन्यथा मनपा मुख्यालय समोर शहरातील प्लास्टिक कचरा गोळा करून ते जाळण्याचे आंदोलन करण्यात येईल.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या