खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला मुदखेड तालुक्यातील गारपीटीचा आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 18/03/2023 9:09 PM

नांदेड : मुदखेड तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गारपिटीमुळे घरांची पडझड झाली आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे
करावेत आणि मूलभूत सुविधा तात्काळ पुरवाव्यात असे निर्देश खा. प्रतापराव पाटील
चिखलीकर यांनी दिले आहेत. मुदखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात गारपिटीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी संबंधित विभागाला आदेशित केले.
आवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. टरबूज, खरबूज, केळी, हरभरा, गहू
मुदखेड तालुक्यात दिनांक 16 मार्च रोजी झालेल्या गारपीट, वादळीवारे आणि
बागायती शेती फळबागा, भाजीपाला, फुलशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.अनेक भागात
झालेल्या गारपिटीमुळे पशुधनही दगावले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घराची छपर
कोसळली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली . झोपड्यांचे प्रचंड नुकसान झाले. तब्बल
चाळीस मिनिटे झालेल्या गारपिटीने शेती उध्वस्त झाली आहे.अशा परिस्थितीत
नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने आणि शेतकऱ्यांना
दिलासा देण्याच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिनांक 18 मार्च
रोजी मुदखेड तालुक्यातील वासरी, आमदुरा, मुगट, इजळी, निवघा, डोंगरगाव या गावांना
भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकरी आणि ग्रामस्थांची संवाद साधला.
त्यांचे प्रश्न आणि अडीअडचणी समजून घेतल्या. त्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
आणि मुदखेड येथे तहसीलमध्ये दुपारी बारा वाजता तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा
आढावा घेतला. उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भागातील वीजपुरवठा खंडित
झाला आहे त्या भागात तातडीने वीज पुरवठा सुरू करावा, पाणीपुरवठा सुरळीत करावा,
मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश दिले आहेत. गारपीटीचे पंचनामे
तातडीने करावेत आणि अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण राज्य
सरकारशी संपर्क करून मुदखेड तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी, पशुधन
मालक आणि कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. त्यामुळे शेतकरी, नागरिक
आणि पशुधन मालक यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्य आणि केंद्र सरकार
आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
यांनी दिला.

Share

Other News

ताज्या बातम्या