ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

19 मार्च रोजी डॉ.हनुमंत भोपाळे यांचे ‘आई’ या विषयावर व्याख्यान


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 3/18/2023 9:01:10 PM

नांदेड :- रामतीर्थ येथील कालवश गिरजाबाई माधवराव गायकवाड यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त रविवार, दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्याते डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांचे ‘आई’ या विषयावर व्याख्यान व भीम स्वरांजली हा गीतगायनाचा कार्यक्रम रामजी आंबेडकरनगर, रामतीर्थ येथे होणार असून यासाठी प्रसिद्ध गायक गौतम पवार भूकमारीकर, अ‍ॅड. संजय भारदे, गंगाधर सोंडारे बावलगावकर, गौतम पोखरणीकर, प्रबता हनुमंते, हिराकांत केरूरकर आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. गंगाधर सोनकांबळे, देवीदास शेरे, दीपक टाकळीकर, बुद्धरत्न पवार आदींची साथ लाभणार आहे.
तरी या प्रबोधनपर कार्यक्रमाचा रामतीर्थ पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत वाघमारे कांगठीकर, गौतम कांबळे, माधवराव गायकवाड, बळीराम गायकवाड, हनुमंत गायकवाड, प्रभाकर गायकवाड यांनी केले आहे.

Share

Other News