ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*कामगार विभागांतर्गत कोणतेही अधिकृत दलाल कार्यान्वित नाहीत - कामगार अधिकारी* *बोगस कार्ड देणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/30/2022 6:45:25 PM

गडचिरोली, दि.30: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत गडचिरोली या कार्यालयात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची Online पद्धतीने नोंदणी केली जाते आणि नोंदणी झालेनंतर कार्यालयाद्वारे बांधकामकामगारांना नोंदणीचे स्मार्ट कार्ड दिले जातात.
परंतु कार्यालयात येणाऱ्या कामगारांकडून माहिती मिळाली की, एका अज्ञान व्यक्तीकडून मु. सुंदरनगर ता. मुलचेरा जि. गडचिरोली येथे नोंदणीचे स्मार्ड कार्ड वितरीत होत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 28/09/2022 रोजी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मु. सुंदरनगर ता. मुलचेरा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन येथील लोकांची चौकशी केली असता लक्षात आले, आशिष देवानंद तागडे या इसमाने सुंदरनगर गावातील लोकांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या कडून पैसे घेऊन मंडळाच्या स्मार्ट कार्ड सारखे बोगस स्मार्ट कार्ड त्यांना वितरीत केले.
त्या अनुषंगाने बोगस स्मार्ट कार्ड देणारा आरोपी  आशिष देवानंद तागडे मु. ठाणेगाव ता. आरमोरी जि. गडचिरोली या व्यक्तीं विरुद्ध दिनांक 29/09/2022 रोजी पोलीस स्टेशन मुलचेरा जि. गडचिरोली  येथे भा.दं.सं. 1860 च्या कलम 420, 465, 467, 471 अन्वये FIR दाखल करण्यात आला, सदर कारवाई मा. अपर कामगार आयुक्त, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र श्रावण उईके, सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली. श्रीमती  गायत्री दुबे दुकाने निरीक्षक, नागपूर, गडचिरोली व कार्यालयातील कर्मचारी  विजय पायदलवार, अतुल कांबळे यांनी केली. बांधकाम कामगारांना सुचीत करण्यात येते की, या कार्यालयाद्वारे कोणतेही अधिकृत दलाल कार्यान्वित नाही तसेच जिल्हा कार्यालया व्यतीरिक्त अन्य ठिकाणी मंडळाचे कार्यालय कार्यरत नाहीत याची नोंद घ्यावी.  तसेच कोणत्याही अज्ञान व्यक्ती कडून होणाऱ्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी करीत आहेत. तसेच Online अर्ज सादर करते वेळी काही अडचणी आल्यास थेट कार्यालयात संपर्क साधावा किवा कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 07132-299469  याचेवर संपर्क साधावा. असे उप जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
****

Share

Other News