ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मनपा क्षेत्रांतील ओपन जिमची दुरावस्था ,मनपाचे दुर्लक्ष...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/30/2022 11:42:23 AM

प्रति
मा आयुक्त
सा मि कु महानगरपालिका

विषय :- सा मि कु मनपा क्षेत्रातील ओपन जिमच्या दुरवस्था बाबत...

महोदय,
सा मि कु महानगरपालिका क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आल्या आहेत. त्यांची आवस्था फार वाईट झालेली आहे, काही ठिकाणी पार्ट मोडून पडलेले आहेत तर काही ठिकाणी चोरीला गेले आहेत तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य बसवण्यात आले आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी तसेच देखभाल दुरुस्ती कालावधी मध्ये सदर साहित्य दुरुस्त करण्यात यावेत 
कोट्यवधी रुपये खर्च करून त्याचा उपयोग होत नसेल तर त्याचा फायदा काय फक्त पुरवठा दाराचा फायदा करण्यासाठी हा प्रकार चालला आहे असे वाटते.
तत्काळ ह्या बाबतीत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल..

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच,सांगली जिल्ह्या

Share

Other News