"बेगाने शादीमें अब्दुल्ला दिवाना" ही पद्धत राष्द्रवादी जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी बंद करावे :- भाजपा संघटन सरचिटणीस दिपक माने

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/01/2022 4:08 PM

 सांगली दि. २०,
       एकीकडे महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायती निवडणुकीमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. परंतु सांगलीमध्ये बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अशीच काहीशी गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  अध्यक्ष संजय बजाज यांची झाली आहे नुकतीच सांगलीमध्ये प्रभाग 16 अ मध्ये पोट निवडणूक पार पडली या प्रभागाचे काँग्रेसचे विद्यमान हारुण शिकलगार यांचे  गेल्या वर्षी दुःखद निधन झाले त्यामुळे या प्रभागात पोटनिवडणूक लागली, परंतु या पोटनिवडणुकीमध्ये राज्यात तीन पक्षाची आघाडी असणारे पक्ष सांगलीत मात्र एकमेकाच्या विरोधात लढताना दिसले दिवंगत काँग्रेसचे नगरसेवक पुत्र तौफिक शिकलगार या प्रभागातून काँग्रेस कडून निवडणूक लढवत होते त्यांच्या वडिलांच्या सहानुभूती मुळे, मतदानाच्या कमी टक्केवारी मुळे कॉंग्रेसने ही निवडणूक जिंकली परंतु या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार देखील पूर्ण ताकतीने लढले परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या विजयामुळे आपली पाठ थोपटताना दिसते म्हणूनच बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना असेच काही चित्र राष्ट्रवादीची चे दिसत आहे. सांगली मध्ये राष्ट्र वादी चे किती नगरसेवक निवडून आलेत यांचे संजय बजाज यांनी आत्मपरीक्षण करावे व नंतर भाजपवर बोलावे. एकीकडे मतदारांच्या मनात  भाजपा उमेदवारा बद्दल तसेच एका विषिश्ट जाती बद्दल जातीयवादाची भीती घालून मतदारांचे ध्रुवीकरण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे केले, परंतु खरी परिस्थिती वेगळीच आहे. ‌यांच्या आघाडीत असणारे दोन्ही पक्ष्याचे उमेदवार या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले त्यावर राष्ट्रवादी एक शब्दही काढण्यासाठी तयार नाहीत? महापौर निवडणुकीच्या दरम्यान पैशाचा घोडेबाजार करून जनतेने भाजपाच्या निवडून दिलेल्या उमेदवारांना खरेदी करून राष्ट्रवादीने आपला महापौर बसवला हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय बजाज यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर ज्या वेळेस उमेदवार निवडून येईल त्या वेळेस स्वतःची पाठ थोपटून घ्यावी व आता पोकळ वासा बडबड बंद करावी असे भाजपा संघटक सरचिटणीस दिपक माने यांनी म्हंटले आहे......

Share

Other News

ताज्या बातम्या