ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती व नगर पंचायतची यंत्रणा सज्ज करा - आमदार डॉ देवरावजी होळी*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/25/2021 10:21:31 PM

सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट  करण्यासाठी कार्यक्रम राबवा

पंचायत समिती कार्यालय व नगरपंचायत  कार्यालया अंतर्गत विविध विभागांची घेतली आढावा बैठक

*दिनांक - २५ ऑक्टोंबर २०२१ चामोर्शी*

*तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समिती व नगर पंचायतची यंत्रणा सज्ज असावी असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी चामोर्शी पंचायत समिती  व नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत  विविध विभागांच्या आढावा बैठकी प्रसंगी केले*
*आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  पंचायत समितीच्या बैठकीला  संवर्ग विकास अधिकारी डुकरे साहेब , सभापती भाऊराव डोर्लिकर , उपसभापती वंदनाताई गौरकार , चंद्रकला आत्राम*
*प्रीती सरकार , सुरेश कामेलवार ,विष्णु ढाली , भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा*
*बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ शहा , यांचेसह विविध विभागाचे विभाग प्रमुख  उपस्थित होते* *तर नगर पंचायत येथे झालेल्या बैठकीला  मुख्याधिकारी सलामे,  यांचेसह विभाग प्रमुख उपस्थित होते.*
 *रस्ते नाली , बंधारे ,स्मशान भूमी , पाणी पुरवठा , प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी , पशू संवर्धन विभाग व महिला बचत गट इत्यादींच्या सर्वांगीण विकासासाठी  यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार महोदयांनी केले.* 
*यावेळी त्यांनी पंचायत समिती व नगर पंचायत कार्यालयांतर्गत करण्यात येणाऱ्या मागिल वर्षी च्या व चालू वर्षातील  कामांचा आढावा घेतला*

Share

Other News