ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोरची-भीमपुर मार्गाचे काम शुरू करा अन्यथा आंदोलन करु - अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 9/21/2021 11:00:24 PM
कोरची - आशिष अग्रवाल

               कोरची मुख्यालया पासून भीमपुर पर्यन्त (5 कि मी) च्या रस्त्यावर मोठ मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. सदर मार्ग हा राज्य मार्ग असून छत्तीसगढ़ला जोड़ला गेला आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याची अशीच दयनीय अवस्था दरवर्षी होत असल्या कारणाने देखभाल दुरुस्तीच्या नावावर प्रशासनाला दरवर्षी लाखो रूपयाचा चुना लावला जात आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असल्यामुळे या मोठ मोठ्या खड्यात पानी भरून राहत असल्यामुळे खड्यांचा अंदाज दुचाकी स्वार तसेच चार चाकी स्वाराना होत नसल्या कारणाने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. काही दिवसापूर्वी याच मार्गावर एका छत्तीसगढ़ च्या व्यक्तीचे अपघात होऊन त्याच्या हाथाचे हाड मोडले होते. 3 दिवसांपूर्वी कोरची येथील एका व्यावसायिकाला सुद्धा घसरून पडल्यामुळे गंभीर दुःखापत झाली व 2 दिवसांपूर्वी छत्तीसगढ़ची एक बस या रस्त्यावर फसल्यामुळे 5-6 तास ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गाने मार्गक्रमन करतानी नागरिकांना खुप अळचनीचा सामना करावा लागत असून याकडे संबधित विभाग सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पावसाळयापूर्वी या रस्त्याची अशीच अवस्था होत असून यामुळे परिसरातील नागरिकांचे खुप हाल होत असल्याचे बघितले जाते.
              काही महिन्यापूर्वी याच मार्गावर 500 मीटर सीमेंट रास्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु सदर रस्त्याचे काम सुद्धा गुणवत्ता पूरक नसल्याचे दिसून येत असल्यामुळे या रस्त्याची चौकशी करून दोषी आढळल्यास कन्त्राटदाराला काळ्या यादीत टाकन्यात यावे व सदर रस्त्याचे काम त्वरीत शुरू करून लवकरात लवकर नवीनीकरण चे कार्य शुरू करण्यात यावे अन्यथा 18 ऑक्टोम्बर ला याच रस्त्यावर बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा ईशारा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरची तर्फे जिल्हाधिकारी यांना तहसीलदार कोरची यांचे मार्फत निवेदनातुन देण्यात आला आहे. निवेदन देतानी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती कोरचीचे तालुका अध्यक्ष आशिष अग्रवाल, शहर अध्यक्ष चेतन कराडे, अभिजीत निम्बेकर, धम्मदीप लाडे, चंदू वालदे, कृष्णा वंजारी, श्याम यादव, रवी बावने, पप्पू सिन्हा, सिद्धू राऊत, भूमेश शेंडे, जयलाल सिन्द्राम, भूषण तेलासी आदि उपस्थित होते.

Share

Other News