ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पूथपाथ अतिक्रमण दूर करण्यासाठी "विशेष फेरीवाला पथक "


  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 10/29/2020 11:56:27 PM

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातील सर्व मुख्य रस्त्यावरील, पदपथावरील अतिक्रमणे हटविण्या साठी मनुष्यबळ व पोलिस दलासमवेत दि. 01/11/ 2020 ते दि. 15/11/2020 या कालावधी मध्ये विशेष मोहिम राबवून धडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील दुकानदार, किरकोळ विक्री करणारे विक्रेते, टपरी धारक व इतर व्यावसायिक यांनी, त्यांच्याकडून महापालिका परिसरातील पदपथांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा होणा-या कारवाई सामोरे जावे, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.


काही दुकानदार आपल्या दुकानासमोरील पदपथांवर अतिक्रमण करतात. त्यामुळे नागरिकांना व पादाचा-यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. फेरीवाले, हातगाडीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमणे यांचे विरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी प्रभागक्षेत्र कार्यालयांतर्गत "विशेष फेरीवाला पथक" गठित करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशा नुसार, महापालिका प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथकां नी पोलीसांच्‍या सहकार्याने,सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान न करणा-या व्यक्तिंविरुध्द दंडनिय कारवाईची मोहिम जोमाने सुरु ठेवली आहे.


दिवसभरात मास्क परिधान न केलेल्या व्यक्तिंकडून, प्रभाग निहाय 
 अ प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 3,000/-,
 ब प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 5,500/-
 क प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 14,000 /- 
 जे प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 2,500/-
 ड प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 2,500/-
 फ प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 2,000/-
 ह प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 3,000 /-
 आय प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये 3,000/- आणि 
 ई प्रभाग क्षेत्रातून रक्कम रुपये 3,500/- असा  एकुण 78 नागरिकांकडून रक्‍कम रुपये 39,000 इतका दंड वसूल करण्‍यात आला आहे.

कोरोनाचा  प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आपल्‍या चेह-यावर मास्‍क व कापड परिधान करावे , असे आवाहन महापालिके मार्फत करण्‍यात येत आहे.

Share

Other News