श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती लोहा, शिक्षण विभागाच्या वतीने भव्य शैक्षणिक प्रदर्शनी उभारण्यात आली असून, ही प्रदर्शनी यात्रेकरू, विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे.
ही शैक्षणिक प्रदर्शनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने, तसेच शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे.
या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये
नवे शैक्षणिक ॲप, अंधश्रद्धा निर्मूलन, शालेय परसबाग, माता-पालक गट, मोफत शैक्षणिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, विद्यार्थी लाभांच्या योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, गुड टच–बॅड टच, मुख्यमंत्री माझी शाळा यासह विविध शासकीय शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
प्रदर्शनस्थळी उपस्थित शिक्षकांकडून यात्रेकरूंना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वाचनीय पुस्तकांची यादी देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शैक्षणिक प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भाविक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी भेट दिली असून माळेगाव यात्रेतील हे प्रदर्शन सर्वांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे, सरस्वती आंबलवाड, विठ्ठल आचणे, डी. आर. शिंदे, केंद्रप्रमुख दत्ता मोहिते, मंगल सोनकांबळे, केंद्रीय मुख्याध्यापक गंगाधर धुळगंडे, तसेच व्यंकट गायकवाड, गजानन अप्परवाड, विषयतज्ज्ञ संजय अकोले, हावगीराव जामकर, बाळू चव्हाण, सचिन किरवले, रवी रायफळे, पल्लवी चौंडेकर, महानंदा केदारे, रफिक दौलताबादी, सिद्धार्थ सोनकांबळे, संदीप साखरे, मारुती डोके, बी. एम. जंगापल्ले, राजेंद्र पाटील, अरविंद ढवळे, बाळू घोरपडे, अजित केंद्रे, अण्णाराव घुमणार
यांच्यासह माळेगाव यात्रा, रीसनगाव व माळकोळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत.
*चौकट*
*राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा विशेष उपक्रम*
या शैक्षणिक प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्य पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक वि. मा. काकडे यांनी सादर केलेला अभिनव उपक्रम होय.
यामध्ये प्रश्नमंजुषा, गणिती खेळ, बुद्धीचा खेळ व संख्याज्ञान यासंबंधीचे फलक व प्रात्यक्षिके काकडे यांनी मांडली आहेत.
आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी भरघोस पारितोषिकांची घोषणा केली होती. 10 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यास 501 रुपये, 9 अचूक उत्तरे देणाऱ्यास 201रुपये तर 8 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यास 101 रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.