ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सामिकु महापालिकेच्या सिटी कमांड सिस्टीम कंट्रोलरूमचे माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/29/2020 3:39:00 PMसांगली महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सिटी कमांड सिस्टीम कंट्रोल रुमचे उदघाटन माजी महसूलमंत्री आम. चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.  याचबरोबर सांगली मिरजेतील रस्ते, पाणी, ड्रेनेज पाईपलाईन कामाचा शुभारंभ सुद्धा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून मिरजेतील एका बागेचेही लोकार्पण करण्यात आले आहे. 
    या लोकार्पण आणि उदघाटन कार्यक्रमास माजी समाजकल्याण मंत्री आम. सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, महापौर गीताताई सुतार , मनपा आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते युवराज बावडेकर,  भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, जेष्ठ नेते माजी उपमहापौर शेखर इनामदार , माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, माजी सभापती सुरेश आवटी , पैलवान पृथ्वीराज पवार यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगलधाम येथे चालणाऱ्या
सिटी कमांड कंट्रोल सिस्टीमच्या कंट्रोल रूममध्ये चालणाऱ्या सर्व कामाची माहिती दिली. तसेच या कंट्रोल रूममधून पूर पट्ट्यावर कसे लक्ष ठेवले जाते आणि मदत कार्याबाबत कसे नियोजन केले जाते याची माहिती दिली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख सतीश सावंत, वैभव वाघमारे, नकुल जकाते यांच्यासह कंट्रोल रुमचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अद्यावत सिटी कमांड कंट्रोल रूमचे आणि व्यवस्थेबद्दल आयुक्त नितीन कापडणीस आणि टीमचे चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन करीत कौतुक केले. तसेच महापालिकेचे हे कंट्रोल रूम आपत्ती काळात नागरिकांना अलर्ट करण्याबाबत मदत आणि बचाव कार्य करण्यास उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया दिली.

Share

Other News