बार्न्स स्कूल मध्ये नाताळाची चाहूल

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 20/12/2025 8:13 PM

बार्न्स स्कूल मध्ये नाताळाची चाहूल 

बार्न्स स्कुल आणि ज्युनियर कॉलेज ,देवळाली येथे नाताळाच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या केले यावेळी
“एका मेंढपाळाची गोष्ट”ही कथा विद्यार्थ्यांनी सादर केली या कार्यक्रमाला ब्रिगेडीयर आकाश बजाज आणि त्यांच्या पत्नी बिंदू बजाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्या उत्तरा कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी चे हे मेंढपाळ  आजोबा ही कथा आपल्या नातवाला सांगतात हीकथा गीताच्या माध्यमाने पुढे जाते ही कथा मदर मेरी  आणि जोसेफ बेथलेहिम ला नोंदणीसाठी निघालेले असतानाच मेरी आपल्या बाळाला जन्म देणार असते पण बेथलेहिम मध्ये आसरा मिळत नाही शेवटी यांना एक मेंढपाळ त्यांना आसरा देतो आणि तेथे जिजसचा जन्म होतो ही जन्मकथा अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने बार्न्स स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सादर केली आणि नाताळाची चाहूल करून दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या