सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई देवरे चिखलीकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/12/2025 7:15 PM

नांदेड :- रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद नांदेडच्या कृषी विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित कै. डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्रवार आऊलवार, माजी सभापती आनंदराव पाटील, रोहित पाटील, मोहीम अधिकारी सचिन कपाळे, गणेश साळवे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणीचे डॉ. देविकांत देशमुख, डॉ. आर. एन. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
       प्रणिताताई पुढे म्हणाल्या, रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खालावतो, उत्पादन खर्च वाढतो आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होत आहेत. सेंद्रिय शेतीतून मिळणारे उत्पादन आरोग्यदायी असून खर्चही कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन त्यांनी केले.
       शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना कृषी विभागाने अधिक प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. या प्रसंगी सन 2025–26 या वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार, जोड आहेर व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. शेतीत सातत्यपूर्ण उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रेरणादायी कार्यासाठी या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

*कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी पुढीलप्रमाणे* 
दीपक माणिकराव पावडे – पुणेगाव (नांदेड), सोमेश्वर हरी खानसोळे- वाडी नियमतुल्लापूर (मुदखेड), आनंदा शिवाजी अंभोरे- सावरगाव (अर्धापूर),
बालाजी नागोराव कदम- चीदगिरी (भोकर), उत्तमराव बाबुराव काळे- मरडगा (हदगाव), बाबुराव भुजंगराव वानखेडे- पळसपूर (हिमायतनगर), परसराम गणपती फोले- लोखंडवाडी (किनवट), शेषराव प्रेमा राठोड- पापळवाडी (माहूर), राजू माधवराव ढगे- इज्जतगाव (उमरी), सूर्यकांत शेषराव उमरे- सालेगाव (धर्माबाद), पोचाबाई नागोराव तुडमे- सगरोळी (बिलोली), सुनील नामदेव चिमणपाडे- कुडली (देगलूर)
रामदास माधवराव माळेगावे- गोजेगाव (मुखेड),बळीराम गंगाधर रुंझे- संगुचीवाडी (कंधार), विश्वनाथ पंडितराव जायभाये- नगारवाडी (लोहा)
संदीप मोहनराव शिंदे- मांजरम (नायगाव) या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शनास विशेष आकर्षण लाभले असून, शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या