पंढरपूर महिला मंडळ संचलित ,महिला मंडळ प्राथमिक शाळा पंढरपूर, या शाळेतील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे.
यात संघर्ष लखन छापछडी,, पियुष महेश सगर, शिवन्या दीपक पवार, श्रेया तानाजी घोडके
हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत.
या परीक्षेसाठी मुख्याध्यापिका सौ लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षिका सौ. अर्पिता कुलकर्णी मॅडम तसेच श्री.अनिल लवटे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका मेधाताई दाते मॅडम तसेच सचिवा डॉक्टर सौ. वर्षां काणे मॅडम तसेच संस्थेतील सर्व संचालकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन केले.