कुपवाड: प्रतिनिधी
स्थानिक सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI), कोल्हापूर शाखा आणि कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स, एमआयडीसी कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी विशेष 'आउटरिच प्रोग्राम ऑन SIDBI's Schemes' या मार्गदर्शनपर सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना सिडबी बँकेचे ब्रँच मॅनेजर आशिष मुघांटे, चेतन मोडे आणि मोहित कटियार यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक उद्योगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमामध्ये कुपवाड, सांगली व परिसरातील उद्योगपती, नवउद्योजक आणि व्यापारी प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी सिडबीच्या अधिकाऱ्यांनी एमएसएमई उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आर्थिक सहाय्य योजना, सुलभ कर्ज सुविधा, व्यवसाय विस्ताराच्या संधी तसेच उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन क्षमता वाढ, निर्यात संधी आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या वित्तीय व विकासात्मक सहाय्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या विविध एमएसएमई योजनांचा लाभ उद्योगांना अधिक प्रभावीपणे मिळावा, स्थानिक उद्योगांचे सक्षमीकरण व्हावे आणि औद्योगिक परिसंस्था अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा 'आउटरिच प्रोग्राम' आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी कार्यकम्रास उद्योजक दिपक चौगुले, सुनिल अष्टेकर, राहुल गुरव, उपेन पटेल, अरुण कुलकर्णी, अमोघ ताडे, अमीन गोलंदाज, सुरेश खोलकुंबे, संदीप बोळाज, अथर्व पाटील एच.आर. सुमंत सरोदे, राजेश हांडगे, निवृत्ती तांदळे, मंदार गोखले, संदीप भोसले, प्रेम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील आणि मदन काटकर यांनी केले.