नांदेड :- मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाणे, नांदेड येथे दाखल घरफोडीचा गुन्हा विमानतळ गुन्हे शोध पथकाने अल्पावधीतच आरोपीस चोरीतील मुद्देमाल सह अटक करण्यात करण्यात यश मिळविले आहे.
फिर्यादी नामे शेख शिबा तरन्नुम शेख सलीम, रा. आसरा नगर, नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून डेल कंपनीचा लॅपटॉप, सोन्याचे कानातील फुल, सोन्याचे गळ्यातील पदक, सोन्याची नथ, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण अंदाजे ₹55,500/- किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 343/2026 कलम 331(3), 331(4), 305 बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच विमानतळ पोलीस ठाण्यातील सपोनि / लोखंडे व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार तसेच इतर तपासाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशईत आरोपी नामे मोहम्मद आवेज मोहम्मद असगर शेख, (वय 19 वर्ष, रा. आसरा नगर, नांदेड) याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील डेल कंपनीचा लॅपटॉप, सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकूण अंदाजे ₹48,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू असून आरोपीकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.
सदरची उल्लेखनीय कार्यवाही ही मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड, रामेश्वर वैजंने, उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे, पोलीस निरीक्षक, राष्ट्रपाल लोखंडे, सहा. पोलीस निरीक्षक, देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक तसचे पथकातील पोलीस अंमलदार पाकलवाड, सातारे, आलेवार व पत्रे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन विमानतळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.