*अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 24/07/2026 6:37 PM

*अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचे-  जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद*

"स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय. ए. एस. अधिकारी होण्यासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन, सकारात्मक विचार असल्यास यश निश्चित मिळते. त्याचबरोबर स्वयंप्रेरणा व योग्य दिशा देखील खूप महत्त्वाची आहे. परीक्षेतील अभ्यासक्रम लक्षात घेऊन नियोजन करावे. सामान्य ज्ञानावरच्या अभ्यासासाठी मर्यादित पुस्तकाचा वापर न करता अनेक साधनांचा वापर करावा.  अभ्यासाबरोबरच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य तेवढेच महत्त्वाचे असते. "असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मा.  आयुष प्रसाद यांनी केले.यू पी एस सी परीक्षेतून पदभरती बाबत माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
                       एस.व्ही.के.टी.देवळाली कॅम्प महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षा करिअर बाबत मार्गदर्शन व्हावे म्हणून "युवा संवाद आणि करिअर मार्गदर्शन" या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आला होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षा आमदार सरोज अहिरे , प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी मा.श्री प्रसाद आयुष साहेब,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, श्री.विष्णूपंत म्हैसधुणे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, श्री.विलास धुर्जड -उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. दिलीप पवार, श्री.बाळासाहेब म्हस्के तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, श्री.सोमनाथ बोराडे देवळाली कॅम्प विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, अजय खांडबहाले  जिल्हाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस, रवींद्र धुर्जड अध्यक्ष देवळाली कॅम्प शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, उपप्राचार्य डॉ. दिलीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापुजनाने  झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रो.डॉ. दिलीप पवार यांनी केले, त्यांनी महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजाचा आढावा घेऊन, नोकरी देणारे महाविद्यालय आहे, असे सांगून भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले." विद्यार्थी दशेपासून स्वतःवर व आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवला, ताणतणाव झेलण्याची मानसिक तयारी ठेवली तर अपयशाला ओलांडून यशाला गवसणी घालता येते. प्रशासकीय सेवेत आल्यानंतरच खऱ्या अथनि समाजसेवेची संधी मिळते याचे समाधान मिळते" असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी  केले.
       तसेच "तरुण पिढी हा देशाचा कणा आणि भविष्य आहे. देशाची प्रगती तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीवर अवलंबून असते परंतु दुर्दैवाने आजची पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. व्यसनामुळे केवळ आरोग्य बिघडते असे नाही, तर संपूर्ण आयुष्य उदध्वस्त होते, म्हणून तरुणांनी निर्व्यसनी राहावे "असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार सरोज अहिरे यांनी केले .
या कार्यक्रमास प्रा.सुनील सौंदणकर, प्रा.सुधाकर पवार, डॉ. प्रेमजी परमार, डॉ.बी. पी.पगार, डॉ.विजय  गायकवाड,प्रा.शशिकांत अमृतकर, प्रा अनिल गवळी, प्रा.भारती पाटील तसेच प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेत्तर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सविता आहेर यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य संजय पाटील यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या