राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विद्यार्थी व युवकांच्या विषयावर आक्रमक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/07/2026 6:36 PM

सांगली : राज्यातील लाखो विद्यार्थी यांचे भविष्य धोक्यात आले असतांनाही सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे वारंवार पेपर फुटणे, भरती प्रक्रियेतील कथित गैर व्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पोलिस भरतीतील कथित गैरव्यवहार तसेच विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झालेली आहे.  याच संदर्भात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करत मा.निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणा-यावर कठोर कारवाई करणेऐवजी सरकारने जबाबदारी टाळणेचा मार्ग स्वीकारला आहे. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नासाठी श्री. सोनम वांगचूक यांनी केलेल्या उपोषण आंदोलनाला सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. तसेच देशातील २० हून अधिक विद्यार्थ्यांनी या संदर्भात आत्महत्या केल्या असतांना नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री यांनी राजीनामा देणे आवश्यक होते. परंतू या असंवेदनशील सरकारने अद्यापपर्यन्त शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांच्या न्याय मागण्याबाबत सरकारची भूमिका निराशाजनक आहे.

या बाबत आमच्या पुढीलप्रमाणे मागण्या आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.

ज्या कंपन्या ब्लॅक लिस्ट मध्ये आहेत त्या व अशा कंपन्यामध्ये संचालक असलेल्या संस्थांना काम देण्यात येवू नये.

NTA संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करुन आवश्यक ती कारवाई करावी ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करुन पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा प्रणाली लागू करावी.

पोलीस भारती प्रक्रियेतील कथित अन्याय दूर करुन पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.

विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा Online घेण्यात येवू नयेत व त्या कायमस्वरूपी Offline घेण्यात याव्यात

या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत ,यावेळी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील , शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज ,  जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील  , निरीक्षक शेखर माने ,विजय बापू पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव ,टी व्ही पाटील शहरजिल्हाध्यक्षा संगीता हारगे , सागर घोडके, सचिन जगदाळे ,अभिजित हारगे, हायुम सावनूरकर, ज्योती आदाटे ,आयुब बारगिर , महेश कुपाडे ,तानाजी गडदे ,ज्योती आदाटे , अलका माने ,स्मिता पाटील ,संदिप मुळीक, डॉ छाया जाधव , विराज कोकणे ,वास्कर शिंदे , विजय माळी ,किसन जानकर ,मन्सूर खतीब विवेक कोकरे,वैशाली धुमाळ , गीतांजली इरकर ,प्रणवी पाटील, उज्वला पाटील, सुजित मोरे, प्रा प्रदीप पाटील, प्रा कृष्णा मंडले, जालिंदर कटरे,कुमार वायदंडे , आयेशा शेख ,विपुल केरीपाळे, विनायक हेगडे ,फिरोज मुल्ला ,सुभाष तोडकर ,नंदकुमार घाडगे , महालिंग हेगडे, सरफराज शेख ,अमित चव्हाण,श्रीशैल्य ढोले, आदर्श कांबळे ,अंजर फकीर  आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या