नांदेड :-जिल्हयातील अवैध व्यवसाय पुर्णतः बंद करण्यासंबंधाने नांदेड जिल्हयातील अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व अवैध जुगार खेळणारे इसमां विरूध्द कारवाई करण्यासाठी मा. श्री डॉ. नीलाभरोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दिनांक 17.07.2026 रोजी मास रेडचे आयोजन केले होते.
सदर मास रेड कामी श्री डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भाग घेतला होता.
सदर मासरेड दरम्यान अवैध दारू, हातभट्टी दारू निर्मिती व अवैध जुगार खेळणारे लोकांचे ठिकाणावर छापा टाकून समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविलेल्या मोहीमेमध्ये नांदेड जिल्हयात एकूण 56 गुन्हे दाखल करून एकूण 67 आरोपीतांवर कारवाई करत एकुण 8,71,790/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.