राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) अल्पसंख्यांक सेलकडून मनपा शाळांतील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/07/2026 5:51 PM

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक सेल, सांगली शहर जिल्हाच्या वतीने महानगरपालिका शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आयोजित या उपक्रमात शाळा क्रमांक १५, १७ आणि ४५ मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.

अल्पसंख्यांक सेलकडून हा उपक्रम गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने राबविला जात असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यामागील उद्देश आहे.

कार्यक्रमात संजयनगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक सुजाता भोपळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वाचन आणि परिश्रम करण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक सेलचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आयुब बारगीर यांनी सांगितले की, महानगरपालिका शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच शिष्यवृत्ती आणि अन्य शैक्षणिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जातात.

यावेळी डॉ. फैयाज शिकलगार,  माजी नगरसेवक मंगूआबा सरगर,  बांधकाम कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायकआबा हेगडे, जिल्हा कार्याध्यक्ष इरशाद पखाली, अनिता पांगम, आयेशा शेख, अक्षय गायकवाड, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अझर सय्यद, अक्रम भाऊ शेख इम्रान पठाण, हाफिज इरफान, असलम मुजावर, फिरोज मिस्त्री यांच्यासह शाळांचे शिक्षक, अल्पसंख्यांक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या